डावे वळण

व्यावसायिक जगात कधीकधी सर्वात साधे बदल सर्वात मोठा प्रभाव पाडतात. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगातील सर्वात मोठ्या कुरिअर कंपनीचे चित्रच बदलून टाकले.

ही गोष्ट २००७ मध्ये सुरू होते, जेव्हा रंगा (Ranga) नावाचा एक भारतीय तरुण UPS मध्ये ‘चीफ सायंटिस्ट’ म्हणून रुजू झाला. त्याच्याकडे ‘ORION’ नावाच्या एका प्रोजेक्टची जबाबदारी सोपवण्यात आली होती. UPS च्या ड्रॉयव्हर्सना सगळ्यात जलद delivery route आखून देण्यासाठीचे ही सिस्टम होती. हा प्रोजेक्ट गेल्या चार वर्षांपासून पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. करोडो डॉलर्सची गुंतवणूक करूनही, ही सिस्टम ड्रायव्हर्सना असे विचित्र रस्ते सांगायची की ड्रायव्हर्सचा संताप व्हायचा. रस्ते वाकड्या-तिकड्या (Zigzag) पॅटर्नचे असायचे, ज्यामुळे वेळ वाचण्याऐवजी वायाच जात होता. कोणताही सामान्य माणूस असता तर हा प्रोजेक्ट त्याक्षणी बंद करून टाकला असता, पण रंगाने तसे केले नाही.

रंगाने माघार न घेता प्रत्येक डेटा पॉईंट बारकाईने तपासण्यास सुरुवात केली. त्याला लवकरच जाणवले की ड्रायव्हर्स केवळ अंतरामुळे वैतागलेले नाहीत, तर त्यांना दुसरीच एखादी गोष्ट त्रास देत आहे. त्याने शोधले की ड्रायव्हर्सचा सर्वाधिक वेळ नेमका कुठे जातो, सर्वाधिक इंधन कुठे जळते आणि सर्वाधिक अपघात कुठे होतात. या सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच गोष्टीकडे जात होते, ती म्हणजे ‘डावीकडे वळणे’ (Left Turns). अमेरिकेसारख्या देशांत जिथे उजव्या बाजूने गाडी चालवली जाते, तिथे डावीकडे वळताना समोरून येणाऱ्या ट्रॅफिकची वाट पाहावी लागते. रंगाच्या लक्षात आले की, एक ट्रक डावीकडे वळण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिटे सिग्नलवर शांत उभा राहतो, ज्यामुळे इंधन जास्त जळते आणि अपघाताची शक्यताही कैक पटीने वाढते.

या माहितीच्या आधारे रंगाने आपला प्रोजेक्ट मॅनेजर बॉब याच्यासोबत मिळून संपूर्ण सिस्टिम पुन्हा डिझाइन केली. त्यांनी असा नियम बनवला की शक्य असेल तिथे डावीकडे वळणे टाळून फक्त सरळ किंवा उजवीकडे वळणारे रस्ते निवडायचे. ऐकायला हे कदाचित विरोधाभासी वाटेल, कारण कधीकधी उजवीकडून वळून जाण्यासाठी अंतर थोडे वाढायचे. मात्र, सिग्नलवर वाया जाणारी ती काही मिनिटे वाचल्यामुळे एकूण प्रवासाचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाचू लागले. २०१२ पर्यंत हा ‘ORION’ सिस्टम पूर्ण UPS मध्ये लागू झाला आणि त्याचे निकाल जबरदस्त होते. या एका बदलामुळे कंपनीची दरवर्षी ४०० दशलक्ष डॉलर्सची बचत झाली आणि ड्रायव्हर्सचा तब्बल १०० दशलक्ष मैलांचा प्रवास कमी झाला.

या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे डेटाची ताकद. आपण नेहमी आपल्या ‘अंतर्ज्ञानावर (intution) ‘ विश्वास ठेवतो. सगळ्यात जवळचा मार्ग हाच सगळ्यात प्रभावी मार्ग वाटतो. ड्रायव्हर्सनाही सुरुवातीला वाटायचे की उजवीकडून लांबून जाणे मूर्खपणाचे आहे. पण जेव्हा डेटा समोर आला, तेव्हा गृहीतकांपेक्षा वास्तव पूर्णपणे वेगळे निघाले.

प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु “एलियाहु गोल्डरॅट” हे देखील कामाच्या वेगापेक्षा विना – अडथळा flow तयार करण्याबद्दल सांगत. कधीकधी आपल्या व्यवसायात किंवा आयुष्यात प्रगती करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे आणि ‘डावी वळणं’ टाळणारे निर्णय घेणेच सर्वात फायदेशीर ठरते.

(संकलन -श्याम धारासूरकर, Librarian, उरण महाविद्यालय उरण )

लायब्ररी हेल्पलाईन नंबर 9892798322

(Please visit library-blog for more articles )

Final Deadline for CEP Submission

Date: 18th March, 2026*

*Department of Commerce*

*URGENT NOTICE*

for SYBCOM Students

*Subject: Final Deadline for CEP Submission*

This is to inform all concerned students that *Monday, 20th March 2026* is the *final date* for submission of the CEP Project Report and Presentation.

Students who fail to submit by the above date will be marked *FAIL in both Internal and External examinations*.

All pending students must *report on 20th March 2026 at 8:30 AM* without fail.

Prof. V. S. Indulkar

Department of Commerce