Run, Operate and Manage by Kapil Patil Educational Institute | UGC Recognised as 2(f) 12(B) | Permanently Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC (3rd cycle) | AISHE code 34145
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत World Trade Center च्या North आणि South टॉवर्स वर दहशतवादी हल्ला झाला. जगप्रसिद्ध Morgan Stanley कंपनीचं ऑफिस या दोन्ही टॉवर्स मध्ये होतं.
Morgan Stanley चे अध्यक्ष आणि COO बॉब स्कॉट यांनी Harvard Business School मध्ये बोलताना एकदा सांगितले होते की, ९/११ चे हल्ले त्यांच्या कंपनीसाठी इतर कोणत्याही घटनेपेक्षा मोठा टर्निंग पॉइंट ठरले.
हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल—एवढ्या भीषण घटनेला ते “टर्निंग पॉइंट” का म्हणाले?
कारण वस्तुस्थिती अशी होती की, त्या काळात World Trade Center मध्ये Morgan Stanley ही सर्वात मोठी भाडेकरू कंपनी होती. तिचे सुमारे २,७०० कर्मचारी त्या इमारतीत कार्यरत होते. पण त्या दिवशी कंपनीने केवळ तेरा कर्मचारी गमावले.
यासाठी ज्यांचे सर्वाधिक आभार मानले जातात, त्या व्यक्तीचे नाव होते रिक रेसकॉर्ला (Rick Rescorla).
रिक रेसकॉर्ला हे व्हिएतनाम युद्धातील माजी सैनिक आणि अमेरिकन सैन्यातील निवृत्त अधिकारी होते. त्याचबरोबर ते खासगी सुरक्षा तज्ज्ञही होते. पुढे ते Morgan Stanley मध्ये World Trade Center साठी सुरक्षा संचालक (Director of Security) म्हणून कार्यरत झाले.
काही कारणांमुळे रिक यांना नेहमीच वाटत असे की World Trade Center चे North आणि South Towers हे दहशतवादी हल्ल्यांसाठी अत्यंत असुरक्षित आहेत.
त्यांचा मित्र डॅनियल हिल हा दहशतवादविरोधी प्रशिक्षण घेतलेला तज्ज्ञ होता.
१९९० मध्ये रिक यांनी त्याला World Trade Center ला बोलावले आणि इमारतीच्या सुरक्षेचे मूल्यमापन करण्यास सांगितले.
रेसकॉर्लाने हिलला विचारले,
“जर तू दहशतवादी असतास, तर या इमारतीवर हल्ला कसा केलास?”
हिलने उत्तर दिले,
“मी स्फोटकांनी भरलेला ट्रक तळघरात नेईन, बाहेर पडेन आणि त्याचा स्फोट घडवून आणेन.”
या दोघांनी याबाबतचा सविस्तर अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला.
पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आणि मग १९९३ मध्ये अगदी त्याच पद्धतीने North Tower च्या खाली स्फोटकांनी भरलेल्या ट्रकचा स्फोट झाला.
या घटनेनंतर रेसकॉर्लाच्या मताला अधिक विश्वासार्हता आणि अधिकार मिळाला.
त्यांना कंपनीने ती इमारत सोडावी असे वाटत होते.
कारण त्यांना अजूनही वाटत होतं की World Trade Center वर पुन्हा दहशतवादी हल्ला होईल.
पण कंपनीला दीर्घकालीन भाडेकरारामुळे त्या इमारतीतून बाहेर पडणे शक्य नव्हते.
म्हणून रेसकॉर्लाने दुसरा मार्ग निवडला.
त्यांनी कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याला—अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह—दर तीन महिन्यांनी आपत्कालीन परिस्थितीत इमारत रिकामी करण्याचा (Emergency Evacuation Drill) सराव अनिवार्य केला.
ते कर्मचाऱ्यांना सांगत असत की, भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अशा अचानक घेतल्या जाणाऱ्या Mock Fire Drills मुळेच आपण स्वतःला सक्षम बनवू शकतो.
या कठोर धोरणामुळे त्यांचे अनेक प्रभावशाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मतभेद झाले.
तरीही त्यांनी नियमित सराव सुरूच ठेवला.
आणि मग आला तो दिवस.
११ सप्टेंबर २००१.
World Trade Center वर दहशतवादी हल्ला झाला.
सकाळी ८:४६ वाजता North Tower वर पहिले विमान आदळले. त्या वेळी South Tower मधील लोकांना जागेवरच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण Rick Rescorla यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून Morgan Stanley च्या कर्मचाऱ्यांना तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. अवघ्या १७ मिनिटांनी दुसरे विमान South Tower वर आदळले.
आपत्कालीन परिस्थितीत आपला मेंदू फारसा विचार करत नाही.
त्या क्षणी आपल्या सवयी आपल्याला वाचवतात.
संकटाच्या वेळी आपण तेच करतो, ज्याचा आपण वारंवार सराव केलेला असतो.
हल्ला सुरू होताच Morgan Stanley चे कर्मचारी तात्काळ इमारत रिकामी करण्यासाठी तयार झाले.
कारण त्यांनी अशा परिस्थितीचा अनेक वर्षे नियमित सराव केला होता.
अतिशय कमी वेळात रेसकॉर्लाने बहुतेक कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले.
सर्वजण सुरक्षित बाहेर पडले आहेत याची खात्री करण्यासाठी ते स्वतः मात्र इमारतीमध्येच होते.
दुर्दैवाने थोड्याच वेळात South Tower (ज्यात ते स्वतः उपस्थित होते) कोसळला.
त्यांचे पार्थिव कधीच सापडले नाही.
तीन आठवड्यांनंतर त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले.
खऱ्या अर्थाने ते एक नायक होते.
११ सप्टेंबर २००१ रोजीच्या त्या हल्ल्यात त्यांनी सुमारे २,७०० लोकांचे प्राण वाचवले.
आपण नेहमी विचार करतो…
“आज काहीच होणार नाही.”
बहुतेक वेळा ते खरंही असतं.
पण म्हणूनच तयारी करायची नसते असं नाही.
कारण तयारी म्हणजे भविष्य सांगण्याची कला नाही.
तयारी म्हणजे कोणतंही भविष्य आलं तरी त्याला सामोरं जाण्याची क्षमता.
व्यवसाय असो, करिअर असो किंवा आयुष्य…
मोठे विजय अनेकदा मोठ्या निर्णयांमुळे मिळत नाहीत.
ते मिळतात…
लहान, कंटाळवाण्या, वारंवार केलेल्या सरावामुळे.
रिक रेसकॉर्लाची खरी ताकद संकटाच्या दिवशी दिसली.
पण ती तयार झाली होती…
त्या आधीच्या हजारो सामान्य आणि कंटाळवाण्या दिवसांमध्ये.
विद्यार्थी मित्रहो,आज तुम्ही कोणत्या गोष्टीचा सराव करत आहात…